Menu
Log in

+91 98224 35518        +91 88888 91583         support@sevankurbharat.org

Blogs

 • 14 Sep 2022 2:15 PM | PRASHANT GAIKWAD (Administrator)


  *बाहेर प्रचंड पाऊस होता आणि राजच्या घरात आनंदाचा अपार पूर आलेला होता*


  आज सकाळ पासूनच रिमझिम चालू होती. दुपारी पावसाचा जोर वाढला होता. बराच आळस अंगात भिनला होता. दुपारचे जेवण झाले आणि चांगलीच ताणून दिली. 


  तीनच्या आसपास फोन वाजला. अर्धवट झोपेतच फोन घेतला.


  "दादा आज जायचे न वस्तीवर ? आम्ही कसे येऊ ?"  योगिताचा फोन होता. 


  "अग पाऊस आहे. कसे जाता येईल ?"


  "जाऊ न दादा. पाऊस थांबेल तो पर्यंत." योगिता खूपच तळमळीने बोलत होती. 


  ती स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय विद्यालयात अंतिम   वर्षाला शिकते. तिचा आज वाढदिवस होता. तिला वस्तीवरील मुलांच्या सोबत तो साजरा करायचा होता. मुलांसाठी केळी,बिस्कीट,वही पेन असे बरेच साहित्य तिने घेऊन ठेवले पण होते. 


  दुपारी पाचला आमचं जायचं ठरलं होतं. साडेचार वाजता जोरात पाऊस आला. योगिता कॉलेज मध्येच होती. ती पावसातच घरी आली. तिचा वस्तीत जाण्याचा निर्धार अपार होता. तिच्या निर्धारा पुढे माझा आळस फिका पडला. 


  पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. तशा परिस्थितीत. योगिता,योगिताची आई आणि सेवांकुरचा संयोजक महादेव सोबत शुभम आम्ही वस्तीवर पोहोचलो.


  नेहमी आम्ही सगळे रस्त्यावरचे बसतो. आज तर चांगलाच पाऊस. वस्तीवरील राजचे घर आमच्या हक्काचे. गाडी वस्तीत पोहनचताच मी जोरात हॉर्न वाजवले. काही क्षणात चाळीस जण राजच्या छोट्या पत्र्याच्या घरात दाटीवाटीने जमा झाली. योगिताचे स्वागत झाले. भरपूर गाणे म्हणलो. एकदम जल्लोषात योगिताचा वाढदिवस साजरा झाला. बाहेर प्रचंड पाऊस होता आणि राजच्या घरात आनंदाचा अपार पूर आलेला होता. सगळेच काही भारलेले होते.


  युवकांच्या मध्ये समाजाबद्दल कृतार्थ भाव नाही असे सर्वत्र म्हंटले जाते. त्यातल्या त्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मध्ये ते अजून कमी असा पण समज असतो. योगिता सारख्या मुली सेवांकुरच्या संपर्कात येतात आणि अपार बदलून जातात. त्यांच्यात दिव्य भाव जागृत होतो. असे सेवेने भारलेले तरुण जर प्रत्येक भागात उभी राहिली तर वेगळेच चित्र आपल्याला पाहिला मिळेल.


  योगिता आता नियमित वस्तीवर येणार आहे. तिच्या आईचा पण वस्तीवर येण्याचा संकल्प आहे. आज कमालीचा जोश मला स्वतःला जाणवत होता.


  लेखक - श्री प्रसाद चिक्षे 

  अंबाजोगाई.


 • 11 Jun 2022 12:08 AM | Deleted user


  "ONE WEEK FOR NATION 2022 SARAGUR, MYSORE KARNATAKA"

  नमस्कार

  सेवांकुर भारत चा अनोखा उपक्रम एक साप्ताह देश के नाम 2022 म्हैसूर येथे नुकतेच पार पडले.

  या वर्षी आपण डॉ. आर बालू यांनी बांदीपुरा जंगल परिसरातील मागास व वनवासी बांधवांच्या सेवेसाठी सुरू केलेली चळवळ स्वामी विवेकानंद युथ मूव्हमेंट च्या केंद्र असलेल्या सरगुर येथे आपला उपक्रम राबवला.

  5 मे 2022 ला दादर येथील स्वामी नारायण मंदिर येथे 300 जणांचे एकत्रीकरण करुन आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. कल्याण स्थानकावर रेल्वे राज्य मंत्री मा. रावसाहेब दानवे यांनी रेल्वे ला हिरवा झेंडा दाखवत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

  24 तासाचा रेल्वे प्रवास, प्रवासातील सह प्रवाशांचा सर्वे, डब्बे मे डिबेट व गट गीत गायन करत विद्यार्थ्यांनी आनंदात पूर्ण केला.

  7 मे 2022 रोजी सकाळी 09:30 वाजता माननीय भैय्याजी जोशी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करत उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

  माननीय भैय्याजी जोशी व स्वामी विवेकानंद युथ मूव्हमेंट चे संस्थापक माननीय आर. बालू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  दरम्यान विद्यार्थ्यांनी Viveka School of Excellence चा सुंदर परिसर व Science park , Vivekanand Memorial Hospital, होशहाळी येथील Viveka Trabal Learning center इत्यादी ची पाहणी केली.

  या उपक्रमातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे, निवड केलेल्या सेवा वस्त्यांमध्ये ( Hadi ) स्थानिक लोकांच्या एका घरी 2 मुलांचा मुक्काम, त्यांच्या सोबत पारंपारिक भोजन व चर्चा. एका नविन ठिकाणी, अनोळखी भाषा बोलणारे, कुठल्याही सोयी सुविधांच्या व्यतिरिक्त त्यांच्या सोबत त्यांच्या पैकीच एक होऊन जगणे मुलांना खूप काही शिकवून व आनंद देऊन गेले.

  मुक्कामाच्या दुसर्‍या दिवशी त्याच गावी मेडिकल कॅम्प च आयोजन केले होते. एकाच दिवशी एकाच वेळी 18 विविध गावांमध्ये सेवांकुर च्या डॉक्टर व विद्यार्थ्यांनी मेडिकल कॅम्प पूर्ण केले.

  एकूण 2500 पेक्षा जास्त पेशंट चे एकाच दिवसात परीक्षण केले व गरजूंना जवळील विवेकानंद मेमोरियल हॉस्पिटल ला जोडून दिले.

  आयुष्यभर भारावून टाकतील अशा आठवणी व अनुभव घेऊन मुलांनी Medical Camp पूर्ण केला.

  मेडिकल कॅम्प करून मुले परत सरगुर ला परतले. संध्याकाळी SVYM च्या अधिकारी गटातील कार्यकर्त्यांचे सामाजिक कार्यातील अनुभव यावर प्रश्नोत्तरे केली.

  सोबतच Motivational Speaker माननीय निलेश सुराणा , Corporate Trainer माणिकताई दामले , सेवा भारती संस्थेचे अखिल भारतीय कार्यकर्ते माननीय विजयराव पुराणिक , स्थानिक MLC माननीय शांताराम सिद्धी , वनवासी कल्याण केंद्राचे पदाधिकारी माननीय श्रीपाद जी या सर्वांचे विविध विषयावर उद्बोधन झाले.

  12 मे 2022 ला चामुंडेश्वरी मातेचे दर्शन घेऊन आम्ही म्हैसूर येथील रामकृष्ण मठात स्वामीजींचे आशीर्वचन ऐकून कार्यक्रमाची सांगता केली.

  या उपक्रमात महाराष्ट्रातील 95 मेडिकल कॉलेज मधून विविध शाखेतील एकूण 260 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सोबतच कर्नाटक राज्यातून 10 व आंध्रप्रदेश राज्यातून 4 विद्यार्थी पूर्णवेळ उपस्थित होते.

  या मुलांना विविध शाखेतील 45 Specialist डॉक्टरांचा पूर्णवेळ सहवास लाभला.

  या पूर्ण प्रवासात अनेक कार्यकर्त्यांचा व संस्थांचा हातभार लाभला आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

  सेवांकुर भारत


 • 13 Jul 2021 12:42 PM | Anonymous

  मनातील भीतीला लढा देत,

  आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सेवांकुर सोबत घरो घरी जाऊन स्क्रिनिंग केले.

  औरंगाबाद, मुंबई, पुणे नागपूर अश्या अनेक ठिकाणी ह्या screening camps चे आयोजन करण्यात आले होते.

  (विडिओ मध्ये फक्त काही जणांचा समावेश असला तरीही या अभियानात सहभागी झालेल्या हजारो स्वयंसेवकांना मनाचा मुजरा.)

  आपल्या सर्वांचेच अनुभव हे अतिशय साहसमाय आहेत.

  आपण हा विडिओ जरूर पहावा वर सर्वांन सोबत share करा.

  विडिओ थेट youtube वर पाहण्या करीत ह्या लिंक वर क्लिक करा 

  https://youtu.be/orAEc6fsze8
 • 21 Jun 2021 12:45 PM | Anonymous

  Moment of great pride for whole India, that now the importance of Yoga has reached every nook and corner of the world. But, the gift given to the world by Bharat, seems to be disconnected from the local life of Indians.

  Yoga is the science evolved for the complete well being (Physical , Mental, Social and Spiritual) of human being.

  On this holy occasion of Yoga-day, where whole world is accepting it as a pure science without connecting it with any religion, Sevankur organized an online yoga session for all of us by Chief guest Dr.Ramesh Ji Pandav sir (M.Tech IIT Roorkee).

 • 26 May 2021 12:46 PM | Anonymous

  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समिती तसेच डॉ.हेडगेवार रुग्णालय व सेवांकुर तर्फे गेल्या दीड महिन्याभरापासून संभाजीनगर शहरात कोरोना लसीकरण जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत 90 विद्यार्थ्यांनी निःस्वार्थ पणे आपलं कर्तव्य बजावले असून हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेणारे आहेत.

  औरंगाबादसह महाराष्ट्रातील विविध कॉलेजातील हे विद्यार्थी शहरात व जिल्ह्यात ग्रामीण भागात जाऊन कोरोना लसीकरणाची जनजागृती करत आहेत. आतापर्यंत अंदाजे अडीच लाख नागरिकांपर्यत ही टीम पोचली आहे. तसेच यामध्ये प्रमुख भूमिका ही विद्यार्थी निभावत आहेत. या जनजागृती चे प्रमुख म्हणून आरती गोहणे तर सहप्रमुख म्हणून दिव्या शंकरे, प्रतिक्षा वाघमारे, रिद्धी साखरे, मिनल ठाकरे, गौरी तोष्णीवाल, स्नेहल पगारे, ईश्वर कानळजे, जोती माहुरे, सायली चव्हाण, ऋषिकेश कळंब, सुजाता खोरसकर, गायत्री मगरे, पूर्वा, केतकी फडके, नंदकिशोर तिवारी, निखिलसिंह सूर्यवंशी, सुभाष कुमावत, अमोल काळे, कृंष्णालाल बासनिवाल, गोपाळ खर्डीकर, सनी राजपूत यांच्यासह सेवांकुर च्या 90 विद्यार्थ्यांनी या दीड महिन्यात वाळूज, साठेनगर, समता नगर, क्रांती नगर, कोकणवाडी, मुकुंदवाडी, सिडको, टीव्ही सेंटर, हर्सूल, उस्मानपुरा, पदमपुरा, मिलिंदनगर, ब्रिजवाडी, नारेगाव, पुंडलिक नगर, जय भवानी नगर, चिखलठाणा, आंबेडकर नगर, सावंगी, फुले नगर व ग्रामीण भागातील 30 गावांमध्ये कोरोना लसीकरणाची जनजागृती केली आहे. हा सर्व उपक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान अंतर्गत सुरू आहे. या विषयात व्यवस्था प्रमुख म्हणून मनु निळे कार्यरत आहेत.

  सेवांकुर ही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली चळवळ असून आज या सेवांकुर संस्थेला 23 वर्षे झाली आहेत. महाराष्ट्राचे संयोजक डॉ.नितीन गादेवाड (छाती विकार तज्ञ, जालना) असून देवगिरी प्रांताचे संयोजक डॉ सारंग माळी (जनरल प्रॅक्टिशनर, तळोदा) तर देवगिरी प्रांत पालक हे डॉ यतींद्र अष्टपुत्रे (हार्ट सर्जन, औरंगाबाद) आहेत.

Copyright © Sevankur. All Rights Reserved.

Powered By   
Powered by Wild Apricot Membership Software