नमस्कार!!🙏🏻
🪔🪔
दीप: ज्योति परं ब्रह्म: दीप: ज्योतिर्जनार्दन:।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते॥
तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!✨🥳
🌱🇮🇳
सेवांकुर भारत
छत्रपती संभाजीनगर विभाग आयोजित
✨दिवाळी फराळ उपक्रम २०२६✨
"दिवाळी फराळ म्हणजे काय?🤔"
विभागातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थी आपल्या शहरातील Consultant (Doctors) यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी फराळाचा आनंद घेतात.
हा उपक्रम केवळ फराळापुरता मर्यादित नसून, एक सुंदर कौटुंबिक एकत्रिकरण आहे. यातून डॉक्टरांशी अनौपचारिक गप्पा, कॉलेज जीवनातील अनुभव, अभ्यास व करिअरविषयी मोलाचे मार्गदर्शन आणि आपुलकीच्या नात्यांची जपणूक होते.
विद्यार्थ्यांना डॉक्टरांच्या अनुभवातून शिकण्याची संधी मिळते, तर Consultants यांनाही आपल्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा मिळतो.
अशा या गप्पा, आठवणी, फराळ आणि आपुलकीच्या वातावरणातून निर्माण होते ती म्हणजे आपली निखळ मैत्री आणि सेवाभावाची सुंदर नाती!! ❤️
चला तर मग, या दिवाळी फराळाच्या माध्यमातून नवीन नाती जोडूया, जुन्या आठवणींना उजाळा देऊया आणि आनंदाचे क्षण एकत्र साजरे करूया!! 🤩
📅उपक्रमाचा कालावधी:
🪔 १५ नोव्हेंबर २०२६ ते १५ डिसेंबर २०२६
विस्तृत नियोजन:
🔸 कोणत्या डॉक्टरांच्या घरी जायचे?
🔸 कोणत्या दिवशी व किती वाजता जायचे?
🔸 गटनायक कोण असणार?
या सर्व गोष्टी Registration नंतर लवकरच कळवण्यात येतील. 🙏🏻🙌🏻
🔴 Registration साठी खालील लिंकवर क्लिक करा:
नोंदणी (Registration) मोफत आहे, परंतु अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
निखिल गोराने:78208 71109
नेहा कुरकुटे:95798 85164
Limited Seats Available! So Register Soon!! 🤩
🌱🇮🇳 सेवांकुर भारत
छत्रपती संभाजीनगर विभाग